शिवक्रांती मित्र मंडळ व कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या वतीने महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा डोंगरे हिचा सत्कार, तर वृक्षरोपण अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


शिवक्रांती मित्र मंडळ व कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या वतीने  महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा डोंगरे हिचा सत्कार, तर वृक्षरोपण अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे हिची निवड झाल्याबद्दल नालेगाव येथे शिवक्रांती मित्र मंडळ व कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या वतीने तीचा सत्कार करुन वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवक्रांतीचे अध्यक्ष संजय (काका) शेळके, कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे, नगरसेवक श्याम नळकांडे, जिल्हा तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, अशोक घोडके, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव बाळू भापकर, रामभाऊ नळकांडे, एनआयएस प्रियंका डोंगरे, जयाताई वांढेकर, ताराबाई कवडे, शोभा शिंदे, प्रभाकर वाघमारे, आबा वांढेकर, दत्ता ठाणगे आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात मिलिंद जपे यांनी महिला मल्ल घडविण्यासाठी व कुस्ती खेळाला चालना देण्याकरिता महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघ महाराष्ट्रात कार्यरत आहे. नाना डोंगरे यांनी आपल्या दोन्ही मुलींना राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू बनवले असून, दोन्ही या क्षेत्रात आपले नांवलौकिक कमवित आहे. प्रतिभा डोंगरे हिची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होणे ही नगर तालुक्याच्या दृष्टीने भुषणावह बाब असून, या महिला मल्लांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच नवीन खेळाडू निर्माण होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रतिभा डोंगरे हिच्या सत्कारानंतर उपस्थितांच्या हस्ते नालेगाव येथील बाळाजीबुवा मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 

संजय (काका) शेळके म्हणाले की, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती या खेळात महिलांनी आपली प्रतिभा सिध्द केली आहे. अनेक नामवंत महिला कुस्तीपटू या क्षेत्रात पुढे आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटूंना चालना देण्यासाठी महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रतिभा डोंगरे हिने राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण तर राज्य शालेय ज्युदो स्पर्धेत रौप्य पदक तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. तीच्या या अनुभवाचा फायदा नवोदित महिला कुस्तीपटूंना होणार आहे. या महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रतिभा डोंगरे हिची निवड होणे ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी डोंगरे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नगरसेवक श्याम नळकांडे यांनी आभार मानून या खेळाला नेहमीच सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News