निधनवार्ता | शहाजापुर गावचे प्रगतशिल शेतकरी माणिकराव ढोमसे यांचे निधन !!


निधनवार्ता | शहाजापुर गावचे प्रगतशिल शेतकरी माणिकराव ढोमसे यांचे निधन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील शहाजापुर गावचे प्रगतशिल शेतकरी व गौतम सहकारी बँकेचे माजी व्हा चेअरमन तसेच दत्त दिगंबर पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र ढोमसे यांचे वडील माणिकराव रामनाथ ढोमसे ( वय ८४ ) यांचे दि.१६ /९ /२०२०रोजी सा.४ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.

कै.माणिकराव ढोमसे यांनी शहाजापुर -सुरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचपद भुषवले असुन शाह जापुर वि.वि. सहकारी सोसायटीचे ते गेली ३५ वर्ष चेअरमन होते तसेच माजी खासदार कर्मवीर कै.शंकररावजी काळेसाहेब यांचे ते कट्टर समर्थक होते.त्यांच्या मागे दोन भाऊ तसेच राजेंद्र ढोमसे, इंद्रभान ढोमसे( पो.पा शहाजापुर) व शरद ढोमसे तिन मुले सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. कै.माणिकराव ढोमसे यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असुन शहाजापुर ग्रामस्थांचा आधार गेल्याची खंत शहाजापुरचे माजी सरपंच शिवाजीराव वर्पे व पत्रकार माणिकराव ऊगले यांनी श्रद्धांजलीपुष्प अर्पण करताना व्यक्त केली. शहाजापुर व सुरेगाव पंचक्रोशीतील नागरीकांनी माणिकराव ढोमेसे यांना भावपूर्ण श्नद्धांजली वाहीली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News