पंतप्रधान नरेंद्र मोंदीजींच्या वाढदिवसा निमित्त शिंगणापुर येथे आशा सेविकांना सायकल वाटप ! !


पंतप्रधान नरेंद्र मोंदीजींच्या वाढदिवसा निमित्त शिंगणापुर येथे आशा सेविकांना सायकल वाटप ! !

अशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद !स्नेहलताताई कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -कोरोना महामारीच्या संकटामुळे देश लाॕकडाऊन असल्याने प्रत्येकजण घरात बसुन होता माञ या कठिण परिस्थितीत आशा सेविका वाड्या वस्त्यावर जाऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करत होत्या. त्यांना जीव धोक्यात घालुन काम करावे लागत आहे. तरीही जीवाची बाजी लावून त्यांचे काम समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत जाऊन सुरू असून हे अनमोल कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील शिंगणापूर येथे सन 2019 -20 या आर्थिक वर्षासाठीच्या सौ कोल्हे यांनी सुचविलेल्या रूपये 25 लक्ष खर्चाच्या सामाजिक सभागृहाचा भुमिपूजन कार्यक्रम सौ कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. शिंगणापूर ग्रामपंचायत हददीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना यावेळी कामकाजाच्या सोयीसाठी सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी सौ कोल्हे पुढे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील विकासकामे करतांना प्रत्येक गावांना न्याय देण्याचे काम केले, समाजपयोगी कामे प्रत्येक गावात करण्यास प्राधान्य दिले, त्यामुळे अनेक वास्तु उभ्या राहिल्या आहे. जन्मभूमी जरी येसगाव असली तरी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेबांपासून,मा. बिपीनदादा आणि आम्ही नेहमीच कर्मभूमी असलेल्या शिंगणापूर गावाच्या विकासासाठी झुकते माप दिले आहे. या गावासाठी जे जे मागितले ते ते दिलेच आहे. हे सामाजिक सभागृह मोठे असुन एक भव्य अशी सुंदर वास्तु उभी राहणार असुन गावक-यांना आपल्या घरातील कार्यालाही याचा उपयोग होणार आहे.

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त शिंगणापूर ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम राबविला, मोदी साहेब हे ख-या अर्थाने आपले रक्षणकर्ते आहे, त्यांनी देशासाठी आपले आयुप्य समर्पित केले, स्वतःला देशासाठी वाहुन घेतले आहे, अशा 

नेत्यांचा वाढदिवस या प्रकारे साजरा होतो ही खरोखर आनंदाची बाब आहे. आशासेविका,आरोग्य सेविकां आणि आदर्श प्रशासक म्हणून गौरविण्यात आलेल्या पोलीस पाटील सौ सविता प्रशांत आढाव यांचा यावेळी सौ कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपाचे जिल्हा प्रतिनिधी शरदराव थोरात,तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,पंचायत समितीच्या सदस्या सौ सुनिता संवत्सरकर, सरपंच सुनिता संवत्सरकर,यादवराव संवत्सरकर,भाउलाल कु-हे, राजेंद्र लोणारी,अंकुश कु-हे, बाळासाहेब संवत्सरकर,शेखर कु-हे,डाॅ विजय काळे,प्रमोद संवत्सरकर,संजय तुळसकर, बाळासाहेब सोनपसारे याप्रसंगी उपस्थित होते.भिमा संवत्सरकर यांनी सुत्रसंचालन केले तर आभार कैलास संवत्सरकर यांनी केले.

- महाआघाडी सरकारकडुन दुर्लक्षीत राहिलेल्या आशा सेविकांकडे शिंगणापुर ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले नाही तर उलट त्यांच्या कामांची दखल घेवुन त्यांना सन्मानित केले - सौ. स्नेहलताताई कोल्हे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News