संगमनेर रोटरी क्लबने राबवलेला उपक्रम करोना संक्रमण थांबवण्यासाठी दिशादर्शक प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांचे प्रतिपादन


संगमनेर रोटरी क्लबने राबवलेला उपक्रम  करोना संक्रमण थांबवण्यासाठी दिशादर्शक  प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांचे प्रतिपादन

शिर्डी, राजेंद्र दूनबळे ,प्रतिनिधी : संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी रोटरी क्लब जगभरात वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून संगमनेर रोटरी क्लबच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संगमनेर शहर व परिसरात विविध कार्यालय तसेच गर्दीच्या ठिकाणी ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर मशीन, सॅनिटायझर व बीपी मॉनिटरिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले असल्याची आल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी दिली.

           संगमनेर शहरातील नगरपालिका कोव्हीड कॉटेज हॉस्पिटल, शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय शासकीय कोव्हीड सेन्टर, घुलेवाडी या ठीकाणी ॲटोमॅटीक हॅन्ड सॅनिटायझर मशीन रोटरी क्लब संगमनेरच्यावतीने कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये रोटरी अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी दोन हँड सॅनिटायझर मशीन, प्रतीथयश आर्थिक नियोजक  सुनील कडलग, डॉ. सुजय कानवडे व उद्योजक सुनील दिवेकर यांनी प्रत्येकी एक ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर मशीन देणगी स्वरूपात दिली आहेत. तसेच उद्योजक दीपक मणियार यांनी पाच लिटरचे दहा हँड सॅनिटायझर, प्रतिथयश व्यवसायिक रमेश दिवटे यांनी एक बीपी मॉनिटरिंग मशीन,  मनमोहन वर्मा यांनी एक बीपी अँप्रेटस देणगी स्वरूपात दिले आहेत.

            संगमनेर रोटरी क्लबतर्फे करण्यात आलेल्या या समाजोपयोगी कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे म्हणाले की, केंद्र शासनाच्या कोविड-19 प्रतिबंधक राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार हात वारंवार सॅनिटायझ करणे व सॅनिटायझर योग्य प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे. रोटरी क्लबतर्फे देण्यात आलेले ॲटोमॅटीक हॅन्ड सॅनीटायझर मशीनमुळे हॅन्ड सॅनीटायझेशन अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होत असल्याने पुन्हा विषाणू संक्रमणाचा धोका राहणार नाही व त्याद्वारे कोविड प्रतिबंधासाठी चांगली मदत होणार आहे. रोटरी क्लबने हाती घेतलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी आहे. प्रशासनाच्यावतीने रोटरी क्लब, संगमनेर तसेच सर्व देणगीदारांचे आम्ही आभार मानतो.

            यावेळी संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभय परमार, संगमनेर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील, रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष नरेन्द्र चांडक, सचिव प्रतिथयश लेखापरीक्षक संजय राठी, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे सचिव योगेश गाडे, दीपक मणियार, सुनील कडलग, डॉ.सुजय कानवडे, घुलेवाडी शासकीय कोव्हीड केअर सेन्टरचे आरोग्य अधिकारी संदीप कचेरीया, नगरपालिका कोव्हीड केअर सेन्टरचे डॉ. किशोर पोखरकर, डॉ. अमोल जंगम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरीचे सचिव योगेश गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News