काष्टी गावातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी तरुणांचे जिल्हा परिषद समोर उपोषण


काष्टी गावातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी तरुणांचे जिल्हा परिषद समोर उपोषण

काष्टी प्रतिनिधी --- काष्टी गावातील विविध महत्वपूर्ण मागण्यांसाठी तरुणांनी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हा परिषदसह जिल्हाधिकारी यांना दिले आहे,याबद्दल सविस्तर माहिती अशी की गेल्या 6 वर्षा पासून काष्टीतील तरुण , श्री सचिन सुदामराव पाचपुते व विक्रम संभाजीराव पाचपुते व

अमित विजय शेटे हे जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत आहेत , परंतु प्रशासनाच्या दुर्लक्ष करणाऱ्या सवयीमुळे आज या तरुणांनी जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याची तयारी  केली आहे,

          आज वारंवार जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड वर 4 ही बाजूने अतिक्रमणे होत आहेत, जिल्हा परिषद चे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत म्हणून अनेक कामे चुकीच्या पध्दतीने चालू आहेत, त्या चुकीच्या कामात अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत . जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड वर ग्रामपंचायत चे मोठ्या प्रमाणात आधीच अतिक्रमण आहे, त्याच ग्राउंड वर गावच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत , त्या पाण्याच्या टाकीचा विषय मा. न्यायालयात सुरू असून आता जिल्हा परिषद ने सरकारी दवाखाना शाळेच्या ग्राउंड वर घेतल्यामुळे काष्टीतील तरुणांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे, गावातील तरुणांना,वयोवृद्ध नागरिकांना पहाटेच्या वेळी, सायंकाळ च्या वेळी फिरण्यासाठी याच मैदानात यावे लागते, गावची यात्राही याच मैदानात भरते, गावातील अनेक मुले मैदानी खेळ याच ग्राउंड वर खेळतात, अशातच गावची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे, आणि अशाप्रकारची अतिक्रमणे वाढत गेली तर भविष्यात मुलांना , गावाला असे ग्राउंड उपलब्ध करून देता येणार नाही , पण दिवसेंदिवस स्थानिक नेते शाळेच्या ग्राउंड चा विषय प्रतिष्ठेचा करत असल्याने जिल्हा परिषद शाळा मोडकळीत काढण्याचा हेतू दिसत आहे, ही शाळा जर मोडकळीत निघाली तर गोरगरीब विध्यार्थ्यांना महागड्या खाजगी शाळेत शिक्षण घेण शक्य नाही , आणि ही येणारी पिढी सुरवातीपासून सुरुवात होण्यापूर्वी मोडकळीत निघण्यास सुरुवात होत आहे, आणि निवेदनामध्ये तरुणांनी 

उपोषणाच्या मागण्या खालील प्रमाणे दिल्या आहेत.

1) दुसऱ्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालय काष्टी ग्राऊंडला(खाली) घेणे

2) जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र काष्टी समोरील 32  व्यापारी गाळ्यांचा( माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या नियमानुसार )फेर लिलाव व तातडीने करणे

3) प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळा काष्टी समोरील अतिक्रमण काढणे बाबत

4) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे चालू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन बांधकामाची जागा जागा बदलणे बाबत

5) काष्टी उपबाजार आवार केंद्र काष्टी यांच्या जागेत ग्रामपंचायत यांची चाललेली  अनाधिकृत वसुली बंद करणे बाबत

 3 वर्षापूर्वी दवाखान्याची जागा स्थलांतरित करावी यासाठी निवेदन जिल्हा परिषद ला दिलेले आहे, ग्रामपंचायत कार्यालय हे तळमजल्यावर घेण्यात यावे असा ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी मांडून मावळत्या सरपंचांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर केला आहे , ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती त्यांनी ही तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश देऊन ही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे ,

काष्टीचा बैल बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याचा कर गोळा करण्याचा ग्रामपंचायत ला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही असा आदेश 2 वरषापूर्वी मंत्रालयातून आलेला तरीही जिल्हापरिषद कार्यवाही करत नाही त्यावर ही कारवाही व्हावी , आणि मा उच्च न्यायालयाने 32 गाळ्यांचे फेर निलाव करण्याचे आदेश 5 वर्षांपूर्वी दिलेले आहेत तरीही अजून जिल्हापरिषद अजून कार्यवाही करत आहे , याव्यतिरिक्त अनेक प्रश्न घेऊन येत्या 21 तारखेला सकाळी 11 वाजता जिल्हापरिषद समोर उपोषण करण्यात येणार आहे, मा जिल्हाधिकारी  आणि  श्रीगोंदा तालुक्यातील लोक प्रतिनिधी यांनाही निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत, या सर्वांच्या उपस्थितित सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यात येणार आहे, अशा लोकहिताच्या मागण्यासाठी हे तरुण उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News