आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात डी.एस.एम. अभ्यास केंद्रास मान्यता


आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात डी.एस.एम. अभ्यास केंद्रास मान्यता

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव येथे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्फत चालविण्यात येणारा शालेय व्यवस्थापन पदविका (डी.एस.एम.) या अभ्यास केंद्रास शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून मान्यता मिळाली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेस सुरवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात - लवकर महाविद्यालयाशी संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनी केले आहे. सदर अभ्यास केंद्रास मान्यता प्राप्त करण्यासाठी आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय व महाविद्यालयाचे समन्वयक श्री  शिवाजीराव लांडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रोहिदास उदमल्ले  यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालीन कर्मचारी या सर्वांचे सहकार्य  लाभले  होते. यासंदर्भात आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव उर्फ  विद्याधरजी काकडे व जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे तसेच शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.लक्ष्मण बिटाळ  यांनी याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News