चोपडजला मुदतीत काम पूर्ण न केलेने ठेकेदार यांचे डिपॉझिट व ठेकेदार परवाना रद्द


चोपडजला मुदतीत काम पूर्ण न केलेने ठेकेदार यांचे डिपॉझिट व ठेकेदार परवाना रद्द

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

चोपडजला मुदतीत काम पूर्ण न केलेने ठेकेदार यांचे डिपॉझिट व ठेकेदार परवाना रद्द करण्यात यावे असे पत्र गटविकास अधिकारी बारामती यांच्याकडून  चोपडज ग्रामपंचायतीस नुकतेच मिळाले आहे.

      चोपडज (ता. बारामती) येथे जिल्हा वार्षिक (विशेष घटक) योजनेअंतर्गत सन २०१७-१८ या साली व्यायामशाळा बांधकाम मंजूर करण्यात आले होते. या कामास पाच लाख रुपये मंजूर असून सदर कामाचे टेंडर दि.३ मार्च २०१९ ला झालेले होते तरी सदर काम अद्याप सुरू झालेले नव्हते त्याची मुदत सहा महिने असतानाही अटी व शर्तीनुसार सदरचे काम अद्यापही पूर्ण केलेले नसल्याकारणाने चोपडज येथील भारतीय बौध्द महासभा तालुका संरक्षण प्रमुख उमेश निवृत्ती गायकवाड यांनी दि.१० जुलै २० रोजी चोपडज ग्रामपंचायतीस पत्र दिले होते तसेच ३ सप्टेंबर रोजी याच कामाबाबत चर्चा देखील केली होती.

या पत्राच्या अनुषंगाने सदर ठेकेदार यांचे डिपॉझिट व ठेकेदार परवाना रद्द करण्यात यावा असे संदर्भीय पत्र बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी नुकतेच दिले आहे. या कामाबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती बारामती कार्यालयास कळविण्यात यावा. सदर बाबत हयगय अथवा टाळाटाळ करण्यात येऊ नये असे या पत्रात नमूद केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News