कोयत्याचा च्या धाकाने दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसर येथील कोयता गँग LCB पुणे ग्रामीण कडून जेरबंद...एलसीबी ची धडाकेबाज कामगिरी


कोयत्याचा च्या धाकाने दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसर येथील कोयता गँग LCB पुणे ग्रामीण कडून जेरबंद...एलसीबी ची धडाकेबाज कामगिरी

विठ्ठल होले पुणे

पुणे -दि.13/09/2020 रोजी 01.35 वाजण्याचे सुमारास चौफुला ते मोरगाव रोडवर मौजे पडवी, ता.दौंड, जि. पुणे गावचे हद्दीत ओढयाजवळ अज्ञात चोरटयांनी, कारमध्ये येवून फिर्यादी श्री.रफिकउद्दीन अब्दुल शकुर खान, रा.सिंधीभोडीया, ता.पितमपुर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश हे चालवित असणारे अशोक लेलँड ट्रकला कार आडवी मारून फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून अशोक लेलँड कंपनीचा ट्रक नं. एम.एच. 10 सी.आर. 4149 व त्यामध्ये असणारा कपडयाचे धाग्याचे 146 बंडल, प्लास्टीकचे 12 रोल, ड्रायव्हर व क्लीनर यांचेकडील रोख रक्कम रू.4,000/- असा एकूण किं.रू. 17,27,193/- किंमतीचा माल जबरी चोरी करून त्यांना पडवी येथून चौफुला मार्गे वरवंड, पुसेगाव घाटामध्ये नेऊन निर्जनस्थळी दमदाटी करून सोडून दिले व ट्रक मालासह घेवून पळून गेले त्याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. 867/20, भा.दं.वि.कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

         सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणेकामी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.मनोज लोहिया साो. यांनी सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहीते यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिला होता. त्यानुसार पो.नि. श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, पो.हवा.चंद्रकांत झेंडे, सचिन गायकवाड, महेश गायकवाड, दत्तात्रय तांबे, निलेश कदम, प्रकाश वाघमारे, राजेंद्र चंदनशिव, पोना सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, गणेश महाडीक, प्रमोद नवले, पो.काॅ. मंगेश भगत, अमोल शेंडगे, अक्षय जावळे यांचे पथक नियुक्त केले हेाते. 

स्था.गु.शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील गेलेला माल अशोक लेलँड ट्रक नं. एम.एच. 10 सी.आर. 4149 हा सासवड ते नारायणपुर रोडवर उभा असून त्यामध्येे चार इसम असून ते ट्रकमधील माल विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधत आहेत अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जावून मौजे भिवडी गावचे हद्दीत ट्रक नं. एम.एच. 10 सी.आर. 4149 हा दिसून आल्याने त्या ठिकाणी सापळा रचून थांबले असता ट्रकजवळ 4 इसम संशयास्पदरित्या घुटमळत असताना दिसल्याने इसम नामे *1)अतुल बाबुराव गजरमल, वय 30 वर्षे्, रा. समृध्दी कन्स्ट्रक्षन आॅफीसमागे, महादेवनगर, हडपसर, पुणे, मुळ रा.कात्रज, जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर, 2) गणेश उर्फ दादया विठ्ठल हवालदार, वय 20 वर्षे, रा. महादेवनगर, इलाहाबाद बॅंकेमागे, मांजरी, हडपसर, पुणे, मुळ रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे, 3) लक्ष्मण उर्फ पंकज धनंजय जाधव, वय 20 वर्षे रा. चौरंग अपार्टमेंट, महादेवनगर, सी विंग, 602, मांजरी, पुणे, मुळ रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, 4) समीर लियाकत पठाण, वय 22 वर्षे्े, रा. गोपाळपट्टी, विशाल काॅलनी, मांजरी रोड, हडपसर, पुणे, मुळ रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बिड* यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चैकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे *इतर साथिदार 5) तेजस बाळासाहेब खळदकर, वय 23  रा. तुकाईदर्शन लेन नं. 4, डायमंड हाऊस, बि.नं. 2, हडपसर, पुणे, मुळ रा. नायगाव, ता. पुरंदर, जि. पुणे, 6) विनोद उर्फ भैया विठ्ठल आदमाने, वय 21 , रा. उदय काॅलनी, महादेवनगर, मांजरी, हडपसर, पुणे, मुळ रा. बोरगांवकाळे, ता. जि.लातूर, 7) स्नेहा उर्फ मच्छी चव्हाण, रा. डवरीनगर, लोखंडीपुलाजवळ, हडपसर, पुणे व दोन अल्पवयीन मुले* असे एकूण ९ जणांनी मिळून  केला असल्याची कबुली दिली आहे. गुन्हा करतेवेळी सदर आरोपींपैकी चार जणांनी महीला नामे स्नेहा उर्फ मच्छी चव्हाण, रा. डवरीनगर, लोखंडीपुलाजवळ, हडपसर, पुणे हिचेसह इंडीगो कारमध्ये जावून ट्रकला कार आडवी मारून ट्रक थांबविला त्यापैकी 4 जण खाली उतरून ट्रक चालकास कोयत्याचे सहाय्याने दमदाटी केली व जबरीने माल काढून घेतला त्याचवेळी इतर 4 आरोपी दोन वेगवेगळया मोटार सायकलवरून येवून ट्रकजवळ कोणास येऊ देत नव्हते असा गुन्हा केल्याची कबुली दिली व तसे निश्पन्न झाले आहे त्यानंतर स्था.गु.शा.पथकाने 6 आरोपी व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात गेलेला  ट्रक, त्यातील कपडयाचे धाग्याचे 119 बंडल, प्लास्टीकचे 12 रोल असा 17,27,193/- किंमतीचा माल जप्त केलेला आहे. आरोपी व मुद्देमाल यवत पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीकरीता जमा केलेला आहे. महीला नामे स्नेहा उर्फ मच्छी चव्हाण हिचा शोध चालु आहे. पकडलेल्या आरोपीपैकी अतुल गजरमल याचेविरूध्द यापुर्वी जबरी चोरी, खंडणी मागणे, मारहाण करणे व खुनाचा प्रयत्न करणे, गणेश हवालदार यांचेविरूध्द मारहाण करणे, दरोडयाचे तयारीत मिळून येणे, समीर पठाण याचेविरूध्द बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, जबरी चोरी, मारहाण  करणे, विनोद आदमाने याचेविरूध्द मारहाण करणे, तेजस खळदकर याचेविरूध्द मारहाण करणे सारखे गुन्हे दाखल आहेत.या धडाकेबाज कामगिरी बद्दल संपूर्ण टीमचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News