कांदा निर्यातबंदी उठवा कोपरगाव महिला राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन


कांदा निर्यातबंदी उठवा कोपरगाव महिला राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन

कांदा निर्यात बंदी उठवावी अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार योगेश कोतवाल यांना देतांना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

  केद्र शासनाने केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यासाठी घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवून तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी कोपरगाव महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. कोपरगाव तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत निवेदन देण्यात आले असून त्यांच्या वतीने नायब तहसीलदार योगेश कोतवाल यांनी निवेदन स्वीकारले आहे.

          दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. कोरोना महामारीमुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत असतांना केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा चुकीचा निर्णय घेवून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठी घेण्यात आलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल अस इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई साबळे, कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेच्या शहराध्यक्षा, नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे, मढी खुर्दच्या सरपंच वैशालीताई आभाळे, सौ. मायादेवी खरे, श्रीमती बेबीआपा पठाण, सौ. वैशालीताई भगत, सौ. शीतलताई लोंढे, सौ. योगिताताई पवार, कु. अक्षिता आमले आदी महिला उपस्थित होत्या.

                

जाहिरात
Search
विडिओ
Recent News