सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाची अंकिता गव्हाणे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय!!


सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाची अंकिता गव्हाणे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या कु.अंकिता संजय गव्हाणे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.उदगीर येथील श्री. हावगीस्वामी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने कोरोना काळातील घडामोडींवर आधारित विषयावर ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आदी जिल्ह्यातून एकूण ५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कु.अंकिता गव्हाणे या विद्यार्थिनीने ‘चांगले दिवस नक्की येतील’ या सादर केलेल्या कवितेस द्वितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक नाईकबा संभाजी गिड्डे-पुणे व तृतीय क्रमांक श्वेता विलास राऊत यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी मिळविला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.दीपक चिदरनार, प्रा.रामदास केदार व अनिता यलमटे यांनी काम पहिले. स्पर्धेचा बक्षीस व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे स्पर्धेच्या संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कु. अंकिता गव्हाणे हिच्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे विश्वस्त आमदार आशुतोष काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व गव्हर्निग कौन्सिल सदस्य तसेच महविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कु.अंकिता हिस प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ,मराठी विभाग प्रमुख डॉ.निर्मला कुलकर्णी व प्रा.भाऊसाहेब कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News