जागतिकअभियंता दिनानिमित्त स्नेह ७५ व विश्वशाली ग्रुपच्या वतीने वैज्ञानिक रावजी शिंदे व वैज्ञानिक डॉ. भरत वाघ यांचा सत्कार


जागतिकअभियंता दिनानिमित्त स्नेह ७५ व विश्वशाली ग्रुपच्या वतीने वैज्ञानिक रावजी शिंदे व वैज्ञानिक डॉ. भरत वाघ यांचा सत्कार

संजय सावंत  अहमदनगर प्रतिनिधी :

प्रदुषण नियंत्रित करण्याकरीता कार्बनविरहीत ग्रीन एनर्जीवर आज आपण  काम करत आहोत. प्रदुषित तापमान असल्याने बफाळ डोंगर वितळत आहेत, तापमान असेच राहल्यास ३०/४० वर्षाने मुंबई, न्यूयॉर्कसारखी  मोठमोठे शहरे समुद्रात एकत्रित होतील. प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी ग्रीन एनर्जी क्रांती सर्व जगभर चालू झाले आहे.ग्रीन व स्वच्छ एनर्जी करण्याचे काम चालू आहे या कामात स्वत: मी करत आहे. या एनर्जीमुळे बिलकुल कार्बन राहणार नाही.असे प्रतिपादन Department of Atonomic Energy चे निवृत्त उत्कृष्ठ वैज्ञानिक तसेच डॉ.एपीजे अब्दुल कलाम एक्सलन्स अॅवार्डप्राप्त रावजी शिंदे यांनी केले.

अभियंता दिन अर्थात सर विश्वैश्वरैय जन्मदिनानिमित्त स्नेह ७५ व विश्वशाली ग्रुपच्या वतीने डिपार्टमेंट ऑफ ऑटोमेनिक एनर्जीचे निवृत्त उत्कृष्ठ वैज्ञानिक तसेच डॉ.एपीजे अब्दुल कलाम एक्सलन्स अॅवार्डप्राप्त रावजी शिंदे व व्हिआरडीईचे सिनिअर वैज्ञानिक डॉ. भरत वाघ यांचा सत्कार विश्वनाथ पोंदे व दिलीप अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमोद महाजन,डॉ प्रविण रानडे,डॉ विनोद सोळंकी,ईश्वर सुराणा आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, आज इलेक्टीकल गाडयात इंधन वापरायचे नाही परंतू त्याने प्रदुषण नियंत्रित होत नाही कारण त्यात तुम्ही बॅटरी वापरता त्यामुळे परत प्रदुषण होते त्यामुळे यावर जपानने काम चालू केले आहे.

विश्वनाथ पोंदे म्हणाले की,ग्रामीण भागातील अतिशय प्रतिकूल परीस्थितीतून आलेले शिंदे व वाघ यांचा सन्मान करणे हे भाग्याचे आहे.शिंदे व वाघ यांनी विविध उच्च पदावर काम करत असून देशाच्या व नगरच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आहे.

अकोलकर म्हणाले की,देशाच्या जडणघडणीत शिंदे व वाघ करत असलेले काम हे गौरवास्पद असून अतिसामान्य कुटुंबातील या दोन व्यक्ती नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. लॉकडाउन नंतर या दोघाचा एक स्वतंत्र कार्यक्रम सर्व नगरकरीता आयोजित करू असे त्यांनी सांगितले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News