तेली समाजातर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा नरेंद्रजी मोदी यांचा सर्व देशवाशियांना आभिमान-हरिभाऊ डोळसे


तेली समाजातर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा    नरेंद्रजी मोदी यांचा सर्व देशवाशियांना आभिमान-हरिभाऊ डोळसे

संजय सावंत अहमदनगर प्रतिनिधी:

नगर-पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताला महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकणारे,अखंड भारताचे स्वप्न पाहणारे,दिन दुबळ्या गरजू लोकांसाठी देश हिताचे निर्णय कठोरपणे यशस्वीपणे राबविणारे,अशक्यप्राय वाटणारे काश्मीरचे कलम ३७० हटविणारे व ऐतिहासिक भव्य श्रीराम मंदिर निर्माण,मुस्लिम महिलांचे तीन तलाख निर्णय,बॉर्डरवर सर्जिकल स्ट्राईक असे विविध निर्णय शांततेच्या मार्गाने सोडविले आहेत.स्वच्छ भारत अभियान,जनधन योजना,नोटबंदी,आरोग्य व विमा पॉलिसी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे.आधुनिक भारताच्या समृद्धी व प्रगतीसाठी अथकपणे कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सर्व देशवाशियांना आभिमान वाटतो.  नरेंद्रजी मोदीजी आपणास देशाची सेवा करण्याची अपार शक्ती व तेज बुद्धी,आयुष्य,श्रद्धा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाओ.हीच सदिच्छा.असे प्रतिपादन तैलिक प्रांतिक महासभेचे नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले.                                       देशाचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेली समाजातर्फे विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.तेलीखुंट येथील श्री संताजी महाराज चौक येथे नागरिकांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तसेच शहरातील विविध चौकातील,गल्लीतील मुक्या जनावरांना व भटक्या कुत्र्यांना दूध व बिस्कीट वाटप करण्यात आली.तसेच नागरदेवळे येथील अंबादास शिर्के माऊली महाराज गोशाळेतील गायींना चार वाटप करण्यात आला.व गोशाळेला गुप्तदान स्वरूपात मदत दिली. याप्रसंगी ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर,तैलिक प्रांतिक महासभेचे नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे,दिनकरराव घोडके,कृष्णकांत साळुंके,विजयराव दळवी,रमेश साळुंके,देविदास साळुंके,चेतन डोळसे,देविदास ढवळे,सोमनाथ देवकर,संतोष दिवटे,गणेश हजारे,अनिल सैदर आदी उपस्थित होते.         

जाहिरात
Search
विडिओ
Recent News