भानगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा: पाच जण अटकेत एक फरार.


भानगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा: पाच जण अटकेत एक फरार.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि.१७:  भानगाव ता. श्रीगोंदा येथील शिवारात एका बंद बंगल्यात छापा टाकून मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल चालणारा हारजितीचा जुगार खेळला जात असल्याची गुप्तमाहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने अचानक छापा टाकून ५ जुगाऱ्यांसह १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला  तर पोलिसांना पाहताच जुगार अड्डा चालक सुरेश पंढरीनाथ गोरे पळून गेला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

>                          याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भानगाव शिवारातील रामदास साबळे यांच्या वस्तीवरील शेतातील बंद बंगल्यामध्ये काही इसम तिरट नावाचा हारजितीचा खेळ खेळत असल्याची माहिती गुप्तमाहितीदाराकडून मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी एक पथक तयार करून भानगाव शिवारातील साबळे वस्तीवरील शेतामधील गुरुवार दि. १७ रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक छापा मारला. बंद बंगल्यामध्ये काही लोक गोल रिंगण करून आपल्या हातात पत्त्या खेळत असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी जुगार अड्डा चालक सुरेश पंढरीनाथ गोरे हा पोलिसांना पाहून पळून गेला.

> तर इतर पाच जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. नाना बाबुराव गायकवाड रा. काष्टी, राजेंद्र मारुती ससे रा. सावेडी अहमदनगर, भारत शिवाजी सोनटक्के रा. चैतन्यनगर बीड, संतोष ज्ञानदेव तोरडमल व सचिन मच्छिंद्र तोरडमल दोघे रा.भानगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.पोलीस हवालदार संजय काळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News