अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि.१७: श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील माजी सरपंच ज्ञानदेव गंगाराम गवते यांची जिल्हा काँग्रेसच्या सह सचिवपदी निवड झाली आहे. यापूर्वीही गवते यांनी जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी व दैनिक सार्वमतच्या सह संपादकपदी काम केले आहे.
गवते यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा काँग्रेस समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष दीपक पाटील भोसले, तालुका समन्वयक स्मितल भैय्या वाबळे व तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.