नगरपालिका उपाध्यक्षपदी बिनरोध रमेश लाढाणे यांची निवड


नगरपालिका उपाध्यक्षपदी बिनरोध रमेश लाढाणे यांची निवड

अंकुश तुपे श्रीगोंदा(प्रतिनिधी):-श्रीगोंदा नगरपालिका उपाध्यक्ष पदी भाजपचे रमेश लाढाणे यांची बिनविरोध निवड झाली.पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षा तर बहुमत भाजपचे असल्याने काँग्रेस,राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निसार बेपारी यांनी माघार घेतल्याने लाढाणे बिनविरोध विजयी झाले

अशोक खेंडके यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते.लॉक डाऊन मुळे उशीर झाला शेवटी यात राजकारण असल्याचा आरोप करत 15 ऑगस्ट रोजी भाजप नगरसेवकांनी उपोषण करून लक्ष वेधल्यानंतर निवडणुकीची घोषणा झाली

भाजपने नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करण्याचे संकेत दिले होते त्यानुसार 7 इच्छुकां पैकी लाढाणे यांची वर्णी लागली.शांत स्वभावाचे नूतन उपनगराध्यक्ष आमदार बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. निवडीनंतर आमदार बबनराव पाचपुते,मावळते उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे,गटनेता मनोहर पोटे,सतिश मखरे,सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले सर्वांना विश्वासात घेऊन पालिका हद्दीत काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला,आमदार पाचपुते,पक्ष,सहकारी नगरसेवक यांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News