MASS च्या प्रदेश महासचिव पदी डॉ परवेज अशरफी


MASS च्या प्रदेश महासचिव पदी डॉ परवेज अशरफी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) 

मुस्लीम आरक्षण संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य (MASS) संघटनेच्या वरिष्ठ पदअधिकारी यांची चर्चा झाली व प्रदेश व जिल्हा स्तरावर संघटना मजबूत करण्याचे व नवीन पदाधिकारी नेमण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. ज्या ठिकाणी संघटनेचे काम चांगले आहे तेथील पदाधीकारींची फेरनिवड करणे व प्रदेश स्तरावरही युवा पिढीला संधी देण्याचे मंजूर करण्यात आले. त्यात अहमदनगर जिल्हा सामाजिक कार्यकर्ते डॉ परवेज अशरफी यांची वर्णी लागली. डॉ परवेज अशरफी  यांचे सामाजिक काम पाहून त्यांची प्रदेश महासचिव पदी एक मताने निवड करण्यात आली नियुक्तीचे पत्र  MASS चे प्रदेश अध्यक्ष रशीद शेख व प्रदेश प्रवक्ते हाजी सय्यद इरशाद अशरफी यांनी दिले. डॉ परवेज अशरफी हे एम आय एम पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असून सामान्य जनतेचे प्रश्नांसाठी प्रशासनाशी नेहमी झटत असतात. MASS संघटना मुस्लीम समाजाचे आरक्षण, स्वरक्षण, सामान्य जनतेचे प्रश्नांसाठी व सामान्य जनतेला न्याय मिळून देण्यासाठी पूर्ण राज्यात काम करीत आहे.  डॉ परवेज अशरफी यांनी प्रदेश अध्यक्ष शेख रशीद व प्रवक्ते सय्यद इरशाद अशरफी यांचे आभार मानले व लवकरच संघटना पूर्ण राज्यात मजबूत करण्याचे आश्वासन दिले. प्रदेश महासचिव पदी निवड झाल्या बद्दल डॉ अशरफी यांचा सर्वांनी अभिनंदन केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News