आपल्या कुटुंबाची आपणच काळजी घ्या,आरोग्य तपासणीस सहकार्य करा !!आमदार आशुतोष काळे


आपल्या कुटुंबाची आपणच काळजी घ्या,आरोग्य तपासणीस सहकार्य करा !!आमदार आशुतोष काळे

कोपरगाव येथे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या अभियानाचा शुभारंभ करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

कोपरगावात माझे कुंटुब माझी जबाबदारी मोहीमेस आमदार आशुतोष काळे चा हस्ते प्रारंभ

कोपरगाव -दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होवून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब,माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या वतीने नगरपरिषद व ग्रामपंचायतमार्फत मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक त्रास असो अथवा नसो तरीदेखील सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. या तपासणीच्या माध्यमातून कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहिल.त्यासाठी कोरोनाला न घाबरता सर्व नागरिकांनी कर्तव्य समजून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.त्याचबरोबर नागरिकांची आरोग्य तपासणी करतांना आपल्या देखील आरोग्याची काळजी घ्यावी अशा काळजीवजा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी कोपरगाव मतदारसंघातील आशा सेविकांना आमदार आशुतोष काळे यांच्याकडून फेस शिल्ड मास्क देण्यात आले.या प्रसंगी  यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,डॉ. कांडेकर मॅडम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,सौ. प्रतिभाताई शिलेदार,संतोष चवंडके, अजीज शेख,डॉ.अजय गर्जे,डॉ.तुषार गलांडे,डॉ. चंद्रशेखर आव्हाड,डॉ.वैशाली आव्हाड,रमेश गवळी,प्रशांत वाबळे,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,नवाज कुरेशी,संदीप कपिले,जावेद शेख,चंद्रशेखर म्हस्के,दिनेश खरे,रावसाहेब साठे,ॲड.मनोज कडू,नारायण लांडगे,ए.जी.लोंगाणी,मनमोहन लोंगाणी,पप्पूशेठ लोंगाणी,रविंद्र देवरे,डॉ.गायत्री काडेकर,राजेंद्र फुलपगर,शुभम लासुरे आदी उपस्थित होते

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News