वृक्षारोपण आणि लाडूचे वाटप करत कोपरगावात नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा


वृक्षारोपण आणि लाडूचे वाटप करत कोपरगावात नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव -पर्यावरणाचा संदेश देत तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण, चष्मे वाटप आणि लाडू चे वाटप करून कोपरगाव विधानसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्षनाखाली  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदार संघात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. 14 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात  येत आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.गरजूंना चष्मे वाटप करून लाडूचे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे ज्येप्ठ नेते अॅड रविंद्र बोरावके, भारतीय जनता पार्टी जिल्हयाची प्रतिनिधी शरदराव थोरात,पराग संधान, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजयुमोचे वैभव आढाव ,गटनेते रविंद्र पाठक,विजयराव आढाव, राजेंद्र सोनवणे,बाळासाहेब नरोडे, 

शिवाजी खांडेकर,सत्येन मुंदडा, संजय पवार,रवि रोहमारे, दिपक जपे, महावीर दगडे,अविनाश पाठक प्रसाद परहे,गोपी गायकवाड,गोपी सोनवणे,अर्जुन मोरे,आदी उपस्थित होते.

नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने कर्तबगार आणि अद्वितीय कामगिरी करणारे नेतृत्व देशाला मिळाल्यामुळे ख-या अर्थाने देश प्रगतीच्या शिखरावर पोहचला असून सामान्य व्यक्तिमत्व असलेले मोदी यांनी गेल्या 6 वर्षाच्या कालखंडात समाजातील सर्वच घटकांचा विचार करून काम केले आहे. सैन्य दलाच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे सैन्यात धाडस निर्माण झाले आहे. प्रसिध्दीपासून दूर राहुन त्यांनी जगात आपल्या कामाचा ठसा उमटविला असल्याचे अॅड रविंद्र बोरावके म्हणाले. शरदराव थोरात, साहेबराव रोहोम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास खैरे यांनी केले तर आभार सत्येन मुंदडा यांनी मांनले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News