संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायात प्रशासकपदी पंचायत समिती महिला व बालक कल्याण विभागाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका एस.एस.जायभाय यांची नियुक्ती झाली असुन दि. १४ सप्टेंबर रोजी त्यांनी प्रशासक पदाची जबाबदारी स्विकारली आहे .
हिंगणी ग्रामपंचायत पंचवार्षीक कार्यकारी मंडळाची मुदत संपली असुन कोरोना जागतिक महामारीच्या पाश्र्वभुमीवर निवडणुक घेणे शक्य नसल्याने शासनाने ग्रामपंचायतचा कारभार पहाण्यासाठी प्रशासकाची नेमणुक केली असुन त्यानुसार हिंगणी गावच्या महीला सरपंच जिजाबाई जयवंत पवार यांनी शाल व श्रीफळ देउन त्यांचा सत्कार केला व ग्रामपंचायत कारभाराची सुत्रे प्रशासक जायभाय यांच्या हाती सोपवली,
यावेळी सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच किरण दहे, दत्तात्रय पाडुरंग पवार,पाडुरंग कुदळे, ग्रामसेवक प्रसाद अडसुळ, सागर केकाण उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील तब्बल २८ पंचवार्षिक कार्यकारी मंडळांची मुदत संपली असुन कोराना संसर्गाच्या पाश्र्वभुमीवर निवडणुक घेणे शक्य नसल्याने शासनाच्या अध्यादेशानुसार ग्रामपंचायतीचा कारभार पहाण्यासाठी प्रशासकाची नेमणुक होणे क्रमप्राप्त झाले आहे परंतु पुरेशा मनुष्यबळा अभावी २१ प्रशासकांची नेमणुक केली असुन पुढील आदेश येईपर्यंत प्रशासक ग्रामपंचायतीचे कामकाज पहाणार असल्याची माहीती पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी दिली आहे.