पळशी परिसराला जोरदार पावसाने झोडपले


पळशी परिसराला जोरदार पावसाने झोडपले

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्‍याच्या पश्चिम जिरायती भागातील पळशी परिसराला बुधवारी दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी पावसाने चांगलेच झोडपले. सुमारे दोन तास मुसळधार पाऊस पडला. यामध्ये अनेकांच्या शेतात, पिकात पुन्हा पाणी साचले व काही प्रमाणात पिकांचेही नुकसान झाले. सगळीकडे पाणीच पाणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाहू लागले. मागील आठवड्यात याच परिसरात पावसाने खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता.

  या  पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ताली, बांध पुन्हा फुटले तर काहींच्या शेतातील माती वाहून गेली. या पावसाने परिसरातील सर्व तलाव, नाले, बंधारे, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News