मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदी आदेशाची होळी !!


मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदी आदेशाची होळी !!

शेवगाव - मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदी आदेशाची होळी करताना भाकप व किसान सभेचे अॅड. सुभाष लांडे, संजय नागरे, बापूराव राशीनकर, वैभव शिंदे व कार्यकर्ते.

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण केंद्र सरकारच्या जाहिर केलेल्या कांदा निर्यातबंदीने कांद्याचे भाव कोसळून शेतकरी आत्महत्येचा खाईत लोटत आहे. शेतकरी विरोधी कांदा निर्यातबंदीचा आदेश केंद्राने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा शेतक-यांसह  जिल्हा व राज्यभर तीव्र स्वरूपाचा लढा उभारू असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी दिला.

भाकप व किसान सभेच्या शेवगाव तहसिल कार्यालयासमोर केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात बुधवारी ( दि. १६ ) निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी मोदी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत कांदा निर्यातबंदी आदेशाची कार्यकर्त्यांनी होळी केली. अॅड. लांडे यांच्यासह किसानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, संजय नांगरे, वैभव शिंदे, गहिनीनाथ आव्हाड, कारभारी वीर आदींसह कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

या वेळी बोलताना अॅड. लांडे म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे  भाव कोसळून शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्राच्या मोदी प्रणित भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भाकप व किसान सभा जाहीर निषेध करीत आहे. केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवल्यावर कांदा उत्पादक शेतक-यांना दोन पैसे मिळू लागले होते. परंतु, आता पुन्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांकादा उत्पादक शेतक-यांवर रडण्याची वेळ येणार आहे. केंद्राने कांदा बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र स्वरूपाचा लढा भाकप व किसान सभा उभारील असा इशारा अॅड. लांडे यांनी दिला. या वेळी तहसिल कार्यालयास निवेदन देण्यात आले.

------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News