माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला संगमनेर शहरात प्रारंभ


माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला संगमनेर शहरात प्रारंभ

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी 

शिर्डी ,महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना मुक्त संगमनेर तालुक्याकरिता राबवण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते संगमनेर शहरात झाला.

           इंदिरानगर गल्ली क्रमांक दोनमध्ये या अभियानाचा प्रारंभ सौ.दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते झाला. यावेळी गजेंद्र अभंग, सौ मनीषा ताई भळगट, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉक्टर पाचोरे, शकील बागवान, अमोल जंगम,  विनायक वाडेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

          महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी सुरू केलेले माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान संगमनेर तालुक्यात सर्वप्रथम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यांनी सुरू केले. याबाबत पदाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन  हे अभियान सुरू करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले होते. प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिका वार्ड, ग्रामपंचायत वार्ड, गावनिहाय पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला भेटून आरोग्यविषयक माहिती देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या होत्या. यानुसार संगमनेर शहरात या अभियानाचा प्रारंभ झाला.

          यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले आहे हे अत्यंत चिंताजनक आहे. घरगुती होणारे समारंभ व गर्दी टाळणे कोरोना नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा यासाठी त्या विभागातील प्रतिनिधीने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून आरोग्याबाबतची माहिती द्यावी तसेच काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयाची संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

तहसिलदार अमोल निकम यांनी या अभियानाची माहिती स्थानिकांना दिली. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.जाहिरात
Search
विडिओ
Recent News