लोकसहभागातून जिरायती भागात कोविड सेंटर उभारणे काळाची गरज-मुनिर तांबोळी


लोकसहभागातून जिरायती भागात कोविड सेंटर उभारणे काळाची गरज-मुनिर तांबोळी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

कोरोना महामारी आणि येणारा काळा भयंकर आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड जाणार आहे, त्यासाठी बारामती तालुक्यातील जिरायती भागातील लोकसहभागातून पहिले कोविड सेंटर लोणी भापकर गावामध्ये उभारण्यात यावे ही काळाची गरज आहे. असे मत लोणी भापकर येथील सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी यांनी व्यक्त केले.

   या सेंटरसाठी प्राथमिक शाळा ताब्यात घेऊन तिथे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर यांच्या देखरेखीखाली विलगीकरन करून गावातच उपचार करता येईल व गावातील रुग्ण गावातील कोविड सेंटरमध्ये बरे होतील. 

हे सेंटर उभारण्यासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था, स्थानिक खाजगी डॉक्टर  यांच्या मदतीने शक्य आहे. यासाठी गरज आहे ती, सर्वांनी पुढे येऊन काम करण्याची असे मत देखील अखिल भारतीय मानवी हक्क संघटना बारामती शाखाअध्यक्ष मुनिर तांबोळी यांनी मांडले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News