स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांना मास्क व सॅनिटायझर वाटप ! !


स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते  कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांना मास्क व सॅनिटायझर वाटप ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करत सेवा सप्ताह साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते दिव्यांग बंधू-भगिनींना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.

आपल्या राष्ट्राला कणखर निर्णयक्षमता असलेले पंतप्रधान लाभले आहेत त्यामुळे देशाचा जगभरात दरारा निर्माण झाला आहे अशा कर्तव्यदक्ष नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी भावना सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली.

   या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी श्री.शरदनाना थोरात,शहराध्यक्ष श्री.कैलास खैरे,दिव्यांग सेल चे तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.बाळासाहेब पानगव्हाने,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री.वैभव आढाव,दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मुक्तार पठाण,श्री.महावीर दगडे,खालीकभाई कुरेशी,श्री.वसंतराव देशमुख,श्री.सतीश रानोडे,श्री.राहुल वाणी,श्री.विलास भाकरे,दिव्यांग सेल कार्यअध्यक्ष श्री.स्वप्नील कडू आदी.सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते,दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते..!!

जाहिरात
Search
विडिओ
Recent News