अहमदनगर जिल्ह्या सह शेवगाव शहरात आणि तालुक्यात 15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम


अहमदनगर जिल्ह्या सह शेवगाव शहरात आणि तालुक्यात  15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम

शेवगांव सह तालुक्यातील सर्व गाव आणि वाडीवस्ती येथे माझे कुटुंब माझी जबबाब्दारी हा कार्यक्रम   राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रभाग क्र 14 मध्ये नगरसेवक कमलेश गांधी यांच्या पुढाकाराने आज शास्त्रीनगर भागात नागरिकांचे आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे या वेळी शेवगावच्या तहसीलदार सौ. अर्चना भाकड/पागिरे तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती. सलमा हिरानी नगरपरिषद शेवगावचे मुख्याधिकारी श्री. अंबादास गर्कळ स्थायी समिती सदस्य श्री सागर फडके परिसरातील नागरसेवक व नागरिक उपस्स्थित होते महाराष्ट्र राज्यात कोवीड-१९  ( कोरोना विषाणू ) या आजाराचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. सध्या लाॅकडाऊन नसल्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे व त्या अनुषंगाने आपल्याला वर्तन करण्यासाठी जनजागृती करावी लागेल.यासाठी आपल्या शहरामध्ये आपण जनजागृती व घरोघरी सर्वेक्षणासाठी  "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही विशेष मोहीम दि. १५/०९/२०२० ते २५/१०/२०२० या कालावधीत राबवित आहोत. या विशेष सर्वेक्षण व जनजागृती मोहीमेत आपण आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश तसेच मधुमेह, हृदयविकार, किडणी यासारखे आजार असणारे व्यक्तीचे सर्वेक्षण तसेच कोरोना संशयित रुग्ण शोधणे यासाठी प्रयत्न करणार आहोत.आपल्या शहरातील आरोग्य उपकेंद्राचे कोरोना दुत पथक येणार आहे. तरी या मोहिमेत घर, कुटुंब, परीसर, गाव आणि राष्ट्राच्या हितासाठी मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुणे, कमीत कमी प्रवास करणे याबाबत लोकजागृती करणार आहोत. युवक मित्र जेष्ठ मार्गदर्शक मंडळी, महिलावर्ग सर्वजण एकजुटीने जागरूक राहून संयमाने आणि धीराने या संकटाचा सामना करुया व माझे कुटुंब माझी जबाबदारी हे कर्तव्य पार पाडूया.या मोहिमेत आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवून कोरोना आरोग्य पथकाला सर्वतोपरी सहकार्य करुन मोहिम यशस्वी कराल

अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News