शिक्षकाच्या मृत्यूस कारणीभूत जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांना निलंबित करा -- गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांची मागणी .


शिक्षकाच्या मृत्यूस कारणीभूत जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांना निलंबित करा -- गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांची मागणी .

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- पुणे जिल्ह्यातील शिक्षक/कर्मचारी यांच्या मृत्यूस कारणीभूत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . भगवान पवार यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी गौतम कांबळे राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडी यांनी निवेदनाद्वारे मा .राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे .याबाबत माहिती देताना श्री गौतम कांबळे म्हणाले की पुणे जिल्ह्यात covid-19 रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे .याला अटकाव घालण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकारी जिवाचे रान करत आहेत .त्यांच्या प्रयत्नाला जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षक ,कर्मचारी व अधिकारी चांगली साथ देत असून अविरतपणे काम करत आहेत .परंतु श्री भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी निष्काळजीपणे वागत आहेत .covid-19 च्या कामकाजासाठी नियुक्त शिक्षक ,कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधनांची वारंवार मागणी करूनही ते पुरेशे उपलब्ध करून देण्यात  आले नाहीत.नियुक्त कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले नाही .श्री पवार यांच्या निष्काळजीपणामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात पुणे जिल्ह्यातील तीन शिक्षकासह पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे .मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करणे, त्यांना आधार देणे या गोष्टीही जिल्हा प्रशासनाने केलेल्या नाहीत .उलट covid-19 ची तपासणी करण्याच्यासाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाजवळ ताटकळत ठेवण्यात आले .त्यांची रॅपिड टेस्ट करायची की स्वब घ्यायचा याचा निर्णयही आरोग्य यंत्रणेतील संबंधित अधिकारी लवकर घेऊ शकले नाहीत .याचा मृतांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला आहे .या सर्व प्रकाराला जिल्हा आरोग्य अधिकारी श्री भगवान पवार हे जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात यावे . मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी श्री पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही .ते बेफिकीरपणे वागत आहेत .अशा  अकार्यक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करून सक्षमपणे काम करणाऱ्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी ही आपणास नम्र विनंती .

      covid-19 चे कामकाजात कर्तव्य बजावताना अनेक शिक्षक, कर्मचारी व अधिकारी बाधित होत आहेत .त्यांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात .व्हेंटिलेटर असलेले बेड तात्काळ उपलब्ध व्हावेत यासाठी योग्य नियोजन जिल्हा प्रशासनाने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला योग्य सूचना व्हाव्यात .

    जिल्ह्यातील मृत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षणाचा लाभ  तात्काळ देण्यात यावा व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड थांबवावी अशीही आपणास विनंती करण्यात येत आहे .

  covid-19 च्या कामकाजात कार्यरत असणार्‍या शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे मृत्यू होणे तसेच त्यांना वेळेवर उपचार न मिळणे .त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन न करणे व त्यांची हेळसांड करणे या सर्व प्रकाराला आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून श्री भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी हे जबाबदार आहेत .त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .निवेदनाच्या प्रती मा . उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .

मा . अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .

मा . राहुलदादा कुल आमदार दौंड .

मा . मुख्यसचिव मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य .

मा . जिल्हाधिकारी पुणे

मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे

मा . अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांना देण्यात आले आहेत .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News