श्रीगोंदयात नवीन ४९ रुग्णांची भर: एकूण बाधीत १३२०


श्रीगोंदयात नवीन ४९ रुग्णांची भर: एकूण बाधीत १३२०

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी: मंगळवार दि.१५ रोजी कोविड केंद्रात ७० रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात २२ जण पॉझिटिव्ह आले. तर १३ जणांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे पाठवले. दि.४ रोजीचा ४४ जणांचा अहवाल अखेर सोमवारी मिळाला त्यातील १७ जण पॉझिटिव्ह आले. दि.१३ रोजीच्या अहवालात ८ जण पॉझिटिव्ह आले तर खाजगी चाचणीत २ जण संक्रमित आढळले. त्यामुळे दि.१५ रोजी एकूण ४९ जण कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. एकूण बधितांची संख्या १३२० झाली आहे. आत्तापर्यंत ११६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या कोविड केंद्रात ८० जण उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये ५३ जण उपचार घेत आहेत.

        श्रीगोंदा शहरात दि.१४ रोजी रॅपिड चाचणीत २ जण दि.४ व दि.१३ रोजीच्या अहवालात ९ जण व खाजगी चाचणीत १ जण पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागात राजापूर-१, लोणी व्यंकनाथ-४,कोळगाव-५, निमगाव खलू-२, पेडगाव-२,काष्टी-२, म्हसे-१,येळपणे-५, श्रीगोंदा कारखाना-१,वांगदरी-१, मढेवडगाव-२,घोगरगाव-२,बेलवंडी बुद्रुक-२,वडगाव शिंदोडी-१,भानगाव-१,निंबवी-२,आर्वी-१, पाटस-२ असे रुग्ण संक्रमित आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News