बाळासाहेब नाहाटासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल


बाळासाहेब नाहाटासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी  :-  तालुक्यातील लोणी व्यंकनाथ मध्ये विनापरवाना जिल्हा सहकारी बँकेच्या कर्ज वाटप कार्यक्रम आयोजित करून त्यांची भोंगा लावून जाहिरात करत गावात कर्जवाटप कार्यक्रमासाठी गर्दी जमवल्याने बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा तसेच जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी यांच्यासह तीस ते चाळीस जणांच्या विरोधात श्रीगोंदे  पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या  जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या साथ रोग प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांचा आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व रविंद्र बोरूडे रा. लोणीव्यंकनाथ यांच्या विरोधात श्रीगोंदे गुन्हा दाखल असताना पुन्हा याच गावात विनापरवाना गावकरी जमवत जिल्हा सहकारी बँकेच्या कर्ज वाटप कार्यक्रम केल्याने नाहटा सह जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी विकास जगताप तसेच अन्य तीस ते चाळीस जणांच्या विरोधात पोलीस स्टेशनला पो.कॉ संतोष कोपनर यांच्याफिर्यावरूनगुन्हा दाखल करण्यात आला आहे 

या मेळाव्याचा ते रविंद्र बोरुडे यांची तीन चाकी रिक्षा मधून भोंगा लावून प्रचार करीत होते .याबाबत एक दिवस अगोदर गुन्हा दाखल असताना.पुन्हा दुसऱ्या दिवशी कर्ज वाटप कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

     बाळासाहेब बन्सीलाल नाहाटा रा.लोणी व्यंकनाथ ,मोहन आनंदराव काकडे ( चेअरमनवि.का.से.संस्था लोणी व्यकंनाथ ) ,आशिष अकुंश लडकत चेअरमन खामकरवाडी सेवा संस्था ,वसंत जगताप ( ता.विकास .अधिकारी जि.मध्यवती बॅक,श्रीगोंदे ) 5.शिदे ( पुर्ण नाव माहीत नाही ) सचिव वि.का.से.संस्था लोणीव्यकनाथ व इतर 30 ते 40 लोकाना  गावात विविध कार्यकारी सोसायटी आवारात जमा करून लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जवाटप कार्यक्रमास हजर राहुन विना परवना गर्दी करुन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेश क्र.डी .सी / कार्या / 9 ब 1/1330/2020 अहमदनगर दि .31 / 08 / 2020 अन्वये आदेशाचे उल्लघंन केले आहे . असल्याने  विरुदध भा.द.वी.क .109,188,269,270 सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News