बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी या परिसरामध्ये शेतकऱ्यांना "कृषीकन्यां" नी शेतातील पीकांसंदर्भात रोगराई व इतर माहिती प्रशिक्षण देत त्यांचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना करून दाखवली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय लोणी येथे शिक्षण घेत असलेल्या व अंतिम वर्षात शिकणारी ऋतुजा होळकर या विद्यार्थिनीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध विषयांतर्गत प्रात्यक्षिके करून दाखवली. यामध्ये तिने खतांचा कसा वापर करावा, पिकांवरील कीड व असणाऱ्या रोगांवर नियंत्रण, चारा उपचार, मातीपरीक्षण अश्या विविध विषयांवर माहिती देत प्रात्यक्षिके दाखवत असताना दीपक होळकर, नंदा होळकर, कृष्णा कारंडे, शुभम कारंडे, यश होळकर इ. शेतकरी उपस्थित होते.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षक संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस, प्रा.निलेश दळे कार्यक्रम समन्वयक, प्रा. रमेश जाधव, डॉ.दिपाली तांबे, अधिकारी अमोल खडके तसेच इतर प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन लाभल्याने शेतकऱ्यांना उत्कृष्टरित्या माहिती देता आली व शेतकऱ्यांनीही दिलेल्या शेतीविषयक माहितीबद्दल कृषिकन्याचे आभार मानले.