कोरोना काळात चोखपणे कर्तव्य बजावणाऱ्या आरटीओ पाटील यांचा स्नेहबंधतर्फे सन्मान


कोरोना काळात चोखपणे कर्तव्य बजावणाऱ्या आरटीओ पाटील यांचा स्नेहबंधतर्फे सन्मान

अहमदनगर :(प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाच्या संकटकाळात चोखपणे आपले कर्तव्य बजावणार्‍या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन आभार मानले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी परप्रांतीय मजुरांची घर वापसी करताना अत्यंत चोख पध्दतीने भूमिका बजावली. नियमाचे पालन करुन तर आर्थिक परिस्थिती अभावी शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीयांना त्यांनी स्वखर्चाने घरी जाण्यास मदत केली. त्यांच्या या प्रशासकीय व सामाजिक कार्याची दखल घेत स्नेहबंध फौंडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी दीपक पाटील यांचे सन्मानपत्र देऊन आभार मानले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सलीम मुन्शी, धनंजय देवकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जागृती फटांगरे, माधवी वाघ, प्रियंका निर्वाण, प्रियंका क्षेत्रे, सुकन्या क्षेत्रे, अमृता वांडेकर, सुरज उबाळे, संकेत मारवाडी, चेतन दसनूर, सोनाली शिरसाट, रुपाली खडसे, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News