श्री.ग.र.औताडे पाटील विद्यालयात हिंदी दिवस साजरा !!


श्री.ग.र.औताडे पाटील विद्यालयात हिंदी दिवस साजरा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

पोहेगाव -दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील नामांकित श्री ग.र औताडे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गवळी यांनी के.म.भुषवले तर थोर हिंदी साहित्यीक मुंन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.बांगर सर यांनी केले.कार्यक्रमास हिंदी विषयाचे शिक्षक श्री.वसावे व श्री.नेहे सर यांनी हिंदी विषयाचे महत्त्व विशद केले सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.तुपे सर श्री.दवंगे सर विद्यालयाचे जे.एस.तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.पवार एस.सी.श्रीम.देव्हारे मॅडम श्रीम.बागुल मॅडम तसेच बागुल सर,खैरनार सर,बोरसे सर, कापसे सर,डहाळे सर,तसेच विद्यालयातील शिपाई मामा आदी सहकारी सेवक उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन श्री.बागुल सर यांनी केले अशा प्रकारे श्री.ग र विद्याल्यात हिंदी दिन सोशल डिस्टिंगशनचे पालन करत संपन्न झाला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News