चांदेकसारे गावात पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन !!


चांदेकसारे गावात पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी    

चांदेकसारे -पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे, संजीवनी उघोग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे यांचा मार्गदर्शनाखाली व कोपरगाव औद्योगीक व साहतीचे चेअमन विवेक भैय्या कोल्हे यांचा  नेतृत्वाखाली चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून सेवा सप्ताह साजरा होत आहे.

 यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चांदेकसारे यांच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्या अर्तगत गावातील थोर महापुरुषांच्या स्मारकांना जलाभिषेक करण्यात आला व परिसर स्वच्छ करत या अभियानास आज सुरुवात झाली.

   या प्रसंगी माजी सरपंच केशवराव होन बोलताना म्हणाले की गावात स्वच्छता मोहीम व सामाजिक उपक्रम राबवुन आपण पंतप्रधान मोदीसाहेबांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या देणार आहोत. या प्रसंगी सरपंच पुनम खरात, विजय केशवराव होन, सर्व ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News