शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी ग्रामपीठाच्या माध्यमातून हसरा शेतकरी, हसरी गावे योजना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार


शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी ग्रामपीठाच्या माध्यमातून हसरा शेतकरी, हसरी गावे योजना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने मांडण्यात आलेल्या ग्रामपीठाच्या प्रस्तावाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या ग्रामपीठाच्या माध्यमातून हसरा शेतकरी, हसरी गावे ही योजना राबविणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

महाराष्ट्र ग्रामपंचायत अ‍ॅक्टचे कलम 45 (6 अ) अन्वये प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामपीठ स्थापन करता येऊ शकते. शेतकर्‍यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे ग्रामविकासाचे अनेक योजना आहेत. मात्र सर्वसामान्य शेतकर्‍यांना या योजना माहीत नसल्याने याचा लाभ त्यांना घेता येत नाही. अनेक गावातील सरपंच व ग्रामसेवकांना देखील योजना माहित नसते.  सरकार या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करत असते. ज्या गावांनी या योजनांचा लाभ घेतला तेथील शेतकर्‍यांचा व गावाचा विकास होण्यास मदत झाली. ग्रामपीठाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे धडे दिले जात असताना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामपीठ हा ग्रामपंचायतशी सतत संपर्कात राहून कार्य करणार आहे. तर विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारींना ग्रामपीठात सन्मानाने काम करण्यास संधी दिली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपीठ हे शेतकर्‍यांचा व गावाचा विकास हे ध्येय ठेऊन कार्य करणार असून, 2ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी राळेगणसिध्दी, हिवरेबाजार व औरंगाबाद येथील पाटोदा या तीन गावांचे नांव हसरा शेतकरी, हसरी गावे योजनेतंर्गत ग्रीन गॅजेटमध्ये प्रसिध्द करणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. हसरा शेतकरी, हसरी गावे या योजनेसाठी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, निवृत्त महसुल उपायुक्त प्रल्हाद कचरे, शाहीर कान्हू सुंबे, अ‍ॅड.सतीशचंद्र राक्षे, विलास लामखडे आदि प्रयत्नशील आहेत.       

जाहिरात
Search
विडिओ
Recent News