निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सल्लागारपदी शिवाजी पालवे यांची नियुक्ती


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सल्लागारपदी शिवाजी पालवे यांची नियुक्ती

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) येथील माजी सैनिक शिवाजी पालवे यांची महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. मंडळाचे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी पालवे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन या माजी सैनिक संघटनेचे शिवाजी पालवे अध्यक्ष आहेत. त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांना बरोबर घेऊन जिल्ह्यात सुरु केलेल्या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेच्या कार्याची दखल घेत त्यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कमिटीवर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे वृक्षमित्र मोरे यांनी सांगितले. पालवे यांच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन, जलसंधारण, प्रदूषणमुक्तीसाठी विविध उपक्रम चालू आहेत. भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. या पदाच्या माध्यमातून राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे पालवे यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News