भिगवण : रोटरी क्लब च्यावतीने कोवीड सेंटरला २५ बेडची मदत - संपत बंडगर


भिगवण : रोटरी क्लब च्यावतीने कोवीड सेंटरला २५ बेडची मदत - संपत बंडगर

भिगवण (प्रतिनिधी)नानासाहेब मारकड

रोटरी क्लब च्या वतीने कोवीड केअर सेंटर ला कोरोना रुग्णासाठी २५ नवीन बेड देण्यात आलेची माहिती अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले. भिगवण कोविड सेंटरच्या डॉ.मृदुला जगताप यांनी कोवीड रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरमध्ये बेडची कमतरता असल्याची  बाब रोटरी क्लब भिगवण येथील पदाधिकारी  यांना सांगितली.भिगवण परीसरातील अनेक गावाचा भिगवण बाजारपेठेशी संबंध येत असतो.आणि त्यामुळे या परीसरात कोवीड रुग्णाच्या संखेत दिवसेंदिवस वाध होत आहे. बेड अभावी रुग्ण उपचारांपासुन वंचित राहु नये म्हणून भिगवण  रोटरी क्लब व  डेक्कन जिमखाना रोटरी क्लब पिंपरी व रोटरी क्लब उद्योगनगरी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज भिगवण कोविड सेंटरला २५ नवीन बेड उपलब्ध करून देण्यात आले तसेच यापुढील काळात भिगवन कोविड केअर सेंटरला काही अडचण व मदत लागल्यास रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व ती मदत करण्याचे अश्वासन रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिले आहे. 

सदर बेड उपलब्ध करून देण्यामध्ये रोटरीयन मंजु फडके व रोटेरीयन नितीन ढमाले यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांनी सांगितले. 

यावेळी, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, सचिन बोगावत,महेश शेंडगे, प्रदीप वाकसे, प्रवीण वाघ ,डॉ. अमोल खानावरे, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे, रणजित भोंगळे, संजय खाडे,प्रमोद नरुटे, औदुंबर हुलगे,  डॉ. जीवन सरतापे, डॉ. मृदुला जगताप, डॉ. घोगरे आदी उपस्थित होते.

" भिगवण कोवीड केअर सेंटरच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप ह्या कोरोना रुग्णाची विशेष काळजी घेत असतात त्यां स्वता आयुर्वेदीक काढा तयार करुन रुग्णाना देतात. तसेच इतर काही जीवनावश्यक वस्तुची कमतरता असल्यास येथील सामाजिक सस्थाच्या मदतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात"

जाहिरात
Search
विडिओ
Recent News