सन 2019-20 चे अनुदानाची रक्कम तातडीने शेतक-यांच्या खात्यात जमा करावी !! स्नेहलता कोल्हे यांची मागणी


सन 2019-20 चे अनुदानाची रक्कम तातडीने शेतक-यांच्या खात्यात जमा करावी !! स्नेहलता कोल्हे यांची मागणी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कृषी विभागाच्या शेततळे,ठिबंक आणि तुषार सिंचनाच्या सन 2019-20 या वर्षातील अनुदानाची रक्कम तातडीने शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार आणि कृषीमंञी नामदार दादाजी भुसे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सन 2019-20 या वर्षाच्या विविध अनुदानाची रक्कम अदयापपर्यंत शेतक-यांना मिळालेली नाही, प्रधानमंत्री कृषी सिंचन ठिबक आवश्यक अनुदान रूपये 30 लाख, राष्ट्रीय कृषी सिंचन योजना शेततळे अस्तरीकरण 14.5 लाख कृषी यांत्रिकीकरण योजनेचे 7.74 लाख, गट शेती योजनेचे 4 लाख , भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे 33 लाख , मागेल त्याला शेततळे 33 लाख खरीप व रब्बी पिक प्रात्यक्षिक 2019-20 चे आवश्यक अनुदान 5.45 लाख तसेच रब्बी हंगाम शेतीशाळा 2019-20 चे आवश्यक अनुदान 1.68 लाख असे सुमारे 1 कोटी 20 लाख रूपयाचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकरी बांधव मोठया आर्थीक संकटाला सामोरे जात आहे. अतिवृष्टी आणि वादळी वा-यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले, अल्पावधीत हातात येणारी पीके भुईसपाट झाली, त्यामुळे मोठा आर्थीक फटका शेतक-यांना बसला आहे. वारंवार येणा-या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहे, अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारे अनुदान मिळत नाही, त्यामुळे सदरचे अनुदान मिळाल्यास शेतक-यांना हातभार लागून या संकटातून बाहेर पडण्यास काहीअंशी मदत होईल, त्यामुळे सन 2019-20 चे अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी,अशी मागणी सौ कोल्हे यांनी वित्त मंत्री अजितदादा पवार व राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचेकडे केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News