श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहाने संपन्न


श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहाने संपन्न

संजय भारती कोपरगाव प्रातिनिधी.

हिंदी भाषा हि आपसांतील प्रेम व बंधुभाव वाढविते !! नंदकीशोर परदेशी

दि. १४ सप्टेंबर रोजी कोपरगांव  शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत उपस्थित मान्यवरांचा हस्ते थोर हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करू राष्ट्रीय हिंदी दिवस  उत्साहाने संपन्न झाला. 

             या वेळी  विदयालयाचे माजी मुख्याध्यापक आणि र.म.परिख ग्रंथालयाचे संस्थापक कार्यवाह श्री.नंदकीशोर परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते अध्यक्षिय भाषणात बोलताना ते म्हणाले की हिंदी ही भाषा आपसांतील प्रेम आणि बंधुभाव वाढवते.ती एकमेकांशी जोडण्याचे काम करते. याप्रसंगी त्यांनी काही काव्यपंक्ती व्यक्त केलेल्या त्या अश्या

सारे विश्व में अपना-

जन-जन को जोडने वाली भाषा

हिंदी राष्ट्र की भाषा चखे

नित ही ध्यान रहे मन मा

निरभय होकर विचरत रहे

नौ रस के सुधर के स्वत में

हिंदी  में हिंद की

अपने भाव को व्यक्त करे,

या काव्यपंक्तीला उपस्थितांनी टाळ्या वाजुन दाद दिली

या प्रसंगी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर श्री.रवी पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत  सुत्रसंचलन श्री,एस.डी.गोरे व आभार प्रदर्शन श्री.ई.एल जाधव यांनी मानले.

        यावेळी  विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी उपस्थित राहुन राष्ट्रीय हिंदी दिवसांच्या शिक्षकांना  शुभेच्छा दिल्या.

      या कार्यक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पाटणी मॕडम,गायकवाड आर.बी, तुपसैंदर डी.व्ही, व्ही.एन.कार्ले, एन.के.बडजाते, सौ.रासकर मॕडम आदी शिक्षक सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News