शेतकरी व जनविरोधी धोरणांच्या विरोधात भाकप व किसान सभेच्या वतीने मागण्यांचे फलक दाखवत तहसिल कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने आंदोलन


शेतकरी व जनविरोधी धोरणांच्या विरोधात भाकप व किसान सभेच्या वतीने मागण्यांचे फलक दाखवत तहसिल कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने आंदोलन

शेवगाव:  शेतकरी व जनविरोधी धोरणांच्या विरोधात भाकप व किसान सभेच्या वतीने मागण्यांचे फलक दाखवत तहसिल कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने आंदोलन करण्यात आले.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देणारा व शेतमालाला हमी भाव नाकरणारा शेतकरी विरोधी अध्यादेश केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावा या मागणीसह जनविरोधी धोरणांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने  शेवगाव तहसिल कार्यालयासमोर मागण्यांचे फलक दाखवत सोमवारी ( दि. १४ ) निदर्शने आंदोलन करण्यात आले.

भाकपचे ज्येष्ठ नेते शशिकांत कुलकर्णी, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, भगवान गायकवाड, आत्माराव देवढे, कारभारी वीर यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी या निदर्शने आंदोलनात सहभागी झाले होते. सोमवार ( दि. १४ ) पासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असल्याचे औचित्य साधून मोदी सरकराच्या शेतकरी व जनविरोधी धोरणांविरोधात हे निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या वेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले,  शेतीमाल, सिंचन व्यवस्था, औषधे, बि- बियाणे, नैसर्गिक आपत्ती आदींबाबत केंद सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबविली आहेत. देशातील २००हुन जास्त शेतकऱ्यांच्या संघटना देशभरात निदर्शने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. कोरोना काळाचा फायदा घेऊन बाजार समित्यांचे अधिकार कार्पोरेट कंपन्याचा  अध्यादेश काढण्यात आला आहे. यातून  दहा लाख कोटी रुपये कोल्ड स्टोअर्ससाठी अनुदान ही कार्पोरेटस कंपन्याच मिळाले नाव फक्त शेतकऱ्यांचे.जीवनावश्यक वस्तूच्या यादीतुन काही शेती माल वगळलेल्याचे सांगुन हमीभाव नाकारण्याचे षंडयंत्र या सरकारने अध्यादेश काढून करण्याचे ठरवले आहे. असा आरोप कुलकर्णी यांनी केला. या वेळी तहसिलदार अर्चना पागिरे - भाकड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News