शेवगाव सिंडिकेट बँक पिक कर्जासाठी शेतकरी मारतोय हेलपाटे स्वाभिमानी गांधीगिरी करून गुलाबपुष्प देणार..


शेवगाव सिंडिकेट बँक पिक कर्जासाठी शेतकरी मारतोय हेलपाटे स्वाभिमानी गांधीगिरी करून गुलाबपुष्प देणार..

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

गेल्या आनेक महिन्यांपासून शेतकरी सिंडिकेट बँकेमध्ये वारंवार चकरा मारून सुद्धा सिंडिकेट बँकेतून कर्ज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे बँकेने कर्ज प्रकरणासाठी हप्त्यातून एकच वार ठेवला आहे त्यादिवशी कधी कधी अधिकारी हजर नसल्यास आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागते तसेच अनेक प्रकरण  तीन-चार महिने पासून  प्रलंबित आहेत  फिल्ड ऑफिसर नाही अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच्या पदाधिकारया कडे आल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बँकेमध्ये भेट घेतली असता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले बँकेमध्ये निल दाखला देण्यासाठी जास्त पैसे आकारले जात आहेत तसेच अनेक शेतकरी शासनाने कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा  बँकेमध्ये चकरा मारत आहेत तसेच कोरोनाच्या महामारी मध्ये शेतकऱ्यांना साथ देण्यापेक्षा बँक शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावत आहे पदाधिकाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फॅक्स द्वारे निवेदन देऊन कल्पना दिलेली आहे.तसेच बँकेच्या कर्ज वितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्पना दिलेली आहे, की येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जपुरवठा मध्ये सुधारणा न झाल्यास गांधीगिरी करून गुलाब पुष्प देण्यात येईल व व तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल. बँक अधिकारी समवेत चर्चा करताना दत्तात्रय फुंदे,संदीप मोटकर व नितेश गटकळ उपस्थित होते.तसेच बँक शेती कर्जाबाबत कुठल्याही बँकेमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यास खालील फोन नंबर  वरती संपर्क साधावा

जाहिरात
Search
विडिओ
Recent News