दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात आढळले 26 रुग्ण, लोकांनी काळजी घ्यावी - डॉ सुरेखा पोळ


दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात आढळले 26 रुग्ण, लोकांनी काळजी घ्यावी - डॉ सुरेखा पोळ

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे,13/9/20 रोजी यवत आणि स्वामी चिंचोली येथील 143 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 26 लोक कोरोना बाधीत आले असल्याचे डॉ सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे.त्यामध्ये पाटस - 6, गार -1, कानगाव - 2,गोपाळवाडी - 3, वासुंदे - 1, कासूर्डी -3,खुटबाव -1,सहजपुर -1, वरवंड - 2,यवत -5,केडगाव -1 असे रुग्ण आढळले आहेत,लोक कोरोना विषयी माहिती लपवत आहेत,थोडे जरी लक्षण दिसून आले तर डॉक्टरांना भेटा भीती बाळगू नका,तुमच्या मुळे घरातील  इतर व्यक्तींना त्रास होणार आहे,ताप,सर्दी खोकला,अंग दुखी अशी लक्षणे दिसू लागले तर त्यावर उपचार घ्या,घाबरु नका लहान मुले,60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होतो, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क वापर करावा असे आवाहन डॉ सुरेखा पोळ यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News