काळवटीचा पाझर तलाव फुटला, सरपंचांची दुरुस्तीची मागणी


काळवटीचा पाझर तलाव फुटला, सरपंचांची दुरुस्तीची मागणी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी मोराळवाडी सीमेवर असणारा काळवटीचा पाझर तलाव या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्याने फूटला आहे. यामुळे सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी वहात असून ओढ्याला पूर आला आहे. व तेच पाणी पुढे वाकीच्या धरणाला जाऊन मिळते.

  सदर पाझरतलाव जिल्हा परिषदच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असून 1972 च्या दुष्काळात ह्या पाझरतलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेतून झाली आहे.

सदर पाझरतलावाची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन 2012 -13 साली झाली होती. या तलावामुळे पळशी- मोराळवाडी परिसरातील बंडगरमळा, मळई, नागाई, कराडमळा, काळवट असे अंदाजे 70 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. 

  हा पाझर तलाव फूटल्याचे कळताच पळशी येथील सरपंच बाबासाहेब चोरमले व मोराळवाडीचे सरपंच निलेश मासाळ, नाना बंडगर, विठ्ठल गुलदगड यांनी या पाझर तलावावर जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली व हा पाझर तलाव लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News