पाटसमध्ये कोरोनाचे शतक!! नागरिकांनी काळजी घ्यावी


पाटसमध्ये कोरोनाचे शतक!! नागरिकांनी काळजी घ्यावी

विट्ठल होले पुणे

पाटस प्रतिनिधी --  पाटस येथील सोमवार रोजी ४० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, यावेळी मंगळवार (ता.०१) रोजी रात्री उशिरा ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे, 

 त्यापैकी एकूण ९ महिलांचे व ९ पुरुषांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, यावेळी भागवतवाडी व तामखडा येथील सर्व संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, 

  यावेळी गानेश्वर नगर येथील सात, गुरुकुल विद्यालय येथील दोन, HP पेट्रोल पंपालगत आठ, बिरोबावाडी एक असे एकूण १८ जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, मोठेवाडा येथील एक अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती आरोग्य सेवक भिमराव बडे यांनी दिली आहे, तसेच नवीन २० कोरोना संशयितांचे अहवाल बुधवार (ता.०२) रोजी प्राप्त होतील,यामुळे पाटसमध्ये एकूण कोरोना आकडा एकूण १११ वर गेला असून कोरोनाने पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी,विनाकारण बाहेर जाऊ नये,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,घरी रहा सुरक्षित रहा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News