नवनाथ सूर्यवंशी (सर )यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !!


नवनाथ सूर्यवंशी (सर )यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

दि.५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतीदिन सर्वत्र "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो.या दिवशी अहमदनगर जिल्हा परीषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चौदा तालुक्यांतून आॕनलाईन प्रस्ताव मागवण्यात आले होते.त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिलेल्या मुद्द्यांनुसार अतिशय पारदर्शी व गोपनीय पद्धतीने प्रस्तावांची छाननी करण्यात आली.यात कोपरगाव तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा हरीसन ब्रँच येथील उपक्रमशील शिक्षक नवनाथ सूर्यवंशी यांची जिल्हा आदर्श पुरस्करासाठी निवड करण्यात आली.

तसेच नवनाथ सुर्यवंशी सरांचा सत्कार आमदार आशुतोषदादा काळे, बिपीनदादा कोल्हे, मा.शिक्षण समिती सदस्य श्री राजेश आबा परजणे यांनी पण सत्कार केला व नवनाथ सुर्यवंशी सरांना भावि वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. नवनाथ सूर्यवंशी यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कालावधीत शाळेवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.विविध देशातल्या मुलांशी व शिक्षकांशी शाळेतील मूलांचा संवाद घडवून आणणे ,शाळेचे मुलांचे वर्गमंत्रीमंडळ निवडताना शालेय निवडणूक घेऊन त्यात EVM मशीनचा वापर केला ज्यामूळे मुलांना लहान वयातच EVM मशीनची ओळख झाली.शाळेत शालेय परसबाग तयार करुन त्यातील भाज्यांचा शालेय पोषणा आहारात समावेश करणे.लेखक आपल्या भेटीला" या अंतर्गत विविध लेखकांशी मुलांचा संवाद घडवून आणला ,ग्लोबल नगरी या उपक्रमाअंतर्गत विदेशात राहणारे भारतीय लोकांशी मुलांचा परीचय करुन दिला.शाळेत दिवाळी साजरी करणे.कृतीयुक्त अध्यापन सहशालेय उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News