पाटस येथील नवीन कोविड सेंटरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट,कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन


पाटस येथील नवीन कोविड सेंटरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट,कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन

विट्ठल होले पुणे

पाटस प्रतिनिधी --  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद (I.A.S.) यांनी आज दिनांक- १२/९/२०२० रोजी दुपारी १२ वाजता पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आयोजित केलेल्या कोरोना सर्वेक्षण मोहीमेची समक्ष भेट देऊन पहाणी केली... त्यावेळी त्यांनी कोरोनाबाबत  मार्गदर्शन करुन कामाबाबत थोडक्यात कर्मचाऱ्याना सुचना दिल्या, तसेच त्यांनी नागेश्वर विद्यालयात नव्याने सुरु करणेत आलेल्या कोवीड सेंटरची पहाणी केली व तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना मार्गदर्शनपर सुचना केल्या त्यावेळी त्यांचे समवेत दौंड-पुरंधर विभागाचे प्रांताधिकारी श्री. प्रमोद गायकवाड, दौंडचे प्रभारी तहसिलदार  श्री. हणमंत म्हेत्रे, निवासी नायब तहसिलदार श्री. सचिन आखाडे, पाटस विभागाचे मंडल अधिकारी श्री. राजेंद्र म्हस्के, दौंड पंचायत समितीच्या सभापती सौ. आशाताई शितोळे, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ. सारिका पानसरे, प्र. गटविकास अधिकारी, पंचायत समिती दौंड, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, पाटस येथील आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, पाटसचे ग्रामसेवक श्री. लांडगे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News