शहर टाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी, शिक्षक, पालक मेळावा संपन्न


शहर टाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने  विद्यार्थी, शिक्षक, पालक मेळावा संपन्न

शहर टाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने  विद्यार्थी, शिक्षक, पालक मेळावा संपन्न झाला. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व कॉ. आबासाहेब काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

        कार्यक्रम प्रसंगी  रोहित सोनवणे, समिक्षा आजबे, विद्यार्थ्यांनी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले.

पालकामधून श्री संजय अडकित्ते  व श्री हरिभाऊ विखे यांनी आपल्या मनोगतात कॉ. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव ने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जून २०२० पासून इ ५ वी ते इ १२ च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी परीक्षा हे उत्कृष्टपणे पार पाडत आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा ॲड. श्री.विद्याधरजी काकडे साहेब, जि. प.सदस्या मा. सौ. हर्षदाताई काकडे व शैक्षणिक विभाग प्रमुख मा.प्रा.श्री. लक्ष्मणराव बिटाळ सर, प्राचार्य श्री.भगत सर, पर्यवेक्षक श्री.चेमटे सर व विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद यांचे आभार मानून पुढील ऑनलाईन चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पालक म्हणून ऑनलाइन शिक्षणा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

      विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय चेमटे यांनी आपल्या मनोगतात आपली शाळा ही जगाच्या एक पाऊल पुढे असावी  असे विचार संस्थेचे प्रमुख  ॲड. विद्याधरजी काकडे साहेब यांचे आहेत कोविड १९ या संकटाला एक संधी म्हणून पाहिले पाहिजे अनेक संकटांचा सामना करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. विद्यालयातील प्रत्येक उपक्रम, ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांनीही या सर्वच बाबींना प्रतिसाद चांगला द्यावा असे आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले.

      अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोरक्षनाथ सातपुते यांनी ऑन लाईन मेळाव्याचा उद्देश विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना ऑन लाईन शिक्षण पद्धतीत येणाऱ्या समस्या एकमेकांना समजाव्यात त्यावर सर्वानुमते विचारविनिमय व्हावा , या तीनही घटकांमध्ये जर उत्तम प्रकारचा सुसंवाद झाला तर या कोरोनाच्या संकटात ऑन लाईन शिक्षण हे आणखी प्रभावी होईल असे  मनोगत व्यक्त केले.

      या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भगत हे ऑन लाईन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेखा शेलार, प्रास्तविक सहदेव साळवे यांनी व्यक्त केले. अनुमोदन गणेश लबडे व आभार आदिनाथ काटे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय मरकड, प्रवीण लद्दे, सर्व शिक्षक बंधू भगिनींनी प्रयत्न केले या प्रसंगी सर्व विद्यार्थी व पालक ऑन लाईन उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News