भिगवण (प्रतिनिधी) जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर यांचेकडून कोरोना सेंटर मधील रुग्णाची विचारपुस....


भिगवण (प्रतिनिधी) जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर यांचेकडून  कोरोना सेंटर मधील  रुग्णाची विचारपुस....

भिगवण प्रतिनिधी-  नानासाहेब मारकड

भिगवण येथील कोरोना सेंटर मध्ये जाऊन रुग्णाची विचारपुस करुन सोयी सुविधांची पाहणी जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केली.

कोरोना सेंटर भिगवण येथे सुरु केल्यापासुन या परीसरातील पॉझीटीव्ह आलेल्या लोकाना कोरोनाचे उपचार चांगल्या प्रकारे मिळतात का यांची पाहणी करण्यासाठी या भागातील कर्तव्यदक्ष जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर  यांनी पीपीइ किट परीधान करुन थेट कोरोना रुग्णालयात प्रवेश करुन रुग्णाची विचारपूस करुन तेथील सुवीधाची माहीती घेतली.तसेच जिल्हा परीषद सदस्य कॅश कार्ड योजनेतुन प्राप्त झालेली ट्रिपल लेयर मास्क,एन ९५ मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, पल्स ऑक्सीमीटर ,थर्मामिटर, सोडिअम क्लोराइड आदी साहीत्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी कोरोना सेंटर मधीलअधिकारी आणि  कर्मचारी यांची रुग्णसेवा पाहुन समाधान व्यक्त केले भिगवण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे आणि समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी कोरोना सेंटर मधील रुग्णाची माहीती दिली.यावेळी जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर मार्केट कमीटीचे संचालक आबासाहेब देवकाते , राजाभाऊ देवकाते, मा. सरपंच अजिनाथ सकुंडे, निलेश गायकवाड, रविंद्र देवकाते उपस्थित होते.l

जाहिरात
Search
विडिओ
Recent News