नगर-मनमाड राज्यमार्गाची नुतनीकरण करतांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य उपाय योजना करा – आमदार आशुतोष काळे


नगर-मनमाड राज्यमार्गाची नुतनीकरण करतांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य उपाय योजना करा – आमदार आशुतोष काळे

 नगर-मनमाड (रा.मा.१०) या राज्यमार्गाची पाहणी करून कन्सल्टंट कंपनी सब्डक्शन झोन कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांन सूचना देतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 नगर-मनमाड (रा.मा.१०) या राज्यमार्गाची अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्यामुळे अक्षरश: चाळणी झाली होती. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुरावूराव्यातून या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार आहे.त्याबाबत या राज्यमार्गाच्या कन्सल्टंट कंपनी सब्डक्शन झोन कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून या राज्यमार्गाची दुरुस्ती करतांना वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

         कोपरगाव तालुक्यातून कोपरगाव शहराला वळसा घालून जात असलेल्या नगर-मनमाड (रा.मा.१०) या राज्यमार्गावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत होते.या खड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत होती. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी या राज्यमार्गाची कोपरगाव परिसराची दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत यापूर्वी बैठक देखील घेतली होती.या राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचे कामासाठी तातडीने निधी मिळावा याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे व राज्यमंत्री ना.दत्ता भरणे यांच्याकडे या महामार्गाचे तातडीने नुतनीकरण करावे अशी मागणी केली होती.त्या पाठपुराव्यातून या राज्यमार्गाचे अहमदनगर ते येवला नाका पर्यंत नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. हे काम करतांना या राज्यमार्गावर पुणतांबा चौफुली, संत जनार्दन स्वामी आश्रम, बेट नाका, श्री साईबाबा चौफुली, येवला नाका आदी ठिकाणी वाहनांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होत असते.या ठिकाणी असलेले शाळा-महाविद्यालय,औद्योगिक वसाहत व कारखाना परिसर व रेल्वे स्टेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना या वाहतूक कोंडीतून जीव मुठीत घेवून हा महामार्ग पार करावा लागतो अशा वेळी या ठिकाणी अनेक अपघात देखील घडलेले आहेत. त्यामुळे नुतनीकरण करतांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या राज्यमार्गाच्या कन्सल्टंट कंपनी सब्डक्शन झोन कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

                     यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,सब्डक्शन झोन कन्सल्टंसीचे अनुप सूर्यवंशी, तानाजी चिटे,सार्वजनिक बांधकामचे अभियंता प्रशांत वाकचौरे,कोपरगाव नगरपरिषदेचे दिगंबर वाघ,संदीप शिरोडे, राजेंद्र जोशी,राहुल चांदगुडे,सचिन गवारे,सोमनाथ आढाव,निलेश पाखरे आदी उपस्थित होते.


              

जाहिरात
Search
विडिओ
Recent News