श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवा – आमदार आशुतोष काळे


श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवा – आमदार आशुतोष काळे

साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवणेबाबत संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याशी चर्चा करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

             कोपरगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना बाधित गंभीर स्वरूपाच्या  रुग्णांसाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी  साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.के.एच. बगाटे यांच्याकडे केली आहे.

              आमदार आशुतोष काळे यांनी श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.के.एच.बगाटे यांची नुकतीच भेट घेवून श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवण्याबाबत चर्चा केली. कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आजपर्यंत वीस रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या कोविड केअर सेंटरवर अतिरिक्त ताण पडला आहे.त्यामुळे कोरोनाबाधित गंभीर पेशंटसाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवल्यास रुग्णांवर वेळेत उपचार होवून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे त्यासाठी बेड आरक्षित ठेवावे व कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी आय.सी.एम. आर.कडे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली असून सदर मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी बाबासाहेब घोरपडे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी उपस्थित होते.


             

जाहिरात
Search
विडिओ
Recent News