चांदेकसारे ग्रामपंचायत देणार आता अंत्यविधीसाठी साहीत्य!!


चांदेकसारे ग्रामपंचायत देणार आता अंत्यविधीसाठी साहीत्य!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील चांदेक सारे ग्रामपंचायतचे वतीने दि१सप्टेंबरपासुन गावात कोणत्याही नागरीकाचे निधन झाल्यास त्याच्या पार्थिव शरीरास आग्नीडाग देण्यासाठी

लागणाऱ्या लाकडाचा ( फुलं )खर्च ग्रामपंचायतचे वतीने करण्यात येणार असल्याची माहीती उप सरपंच विजय केशवराव होन यांनी दिली आहे .कोरोना महामारीचे काळात हाताला काम नसल्याने मोलमजुरी करणाऱ्या व हातावरचे पोट असणाऱ्या नागरीकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतआहे.त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री अपरात्री निधन झालेल्या व्यक्तिच्या पार्थिवास अग्निडाग देण्यासाठी लागणारी वाळलेली लाकडे उपलब्ध करणे अतिशय अवघड असते.त्यासाठी वेळेला खुपच कसरत करावी लागते.

त्यावर तोडगा म्हणुन माजी सरपंच केशवराव होन यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राम पंचायतचे माध्यमानुन गावातील निधन झालेल्या कुठल्याही व्यक्तीला अग्नीडाग देण्यासाठी लागणारे वाळलेले लाकूड ( फुलं ) विनामुल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात असुन या बाबत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी एकमताने हा निर्णय घेतलाल्याचे माजी सरपंच केशवराव होन यांनी  सांगीतले असुन ते पुढे म्हणाले की, पावसाळ्याचे दिवस असल्याने अंत्यविधीसाठी वेळेत व्हावा. तसेच घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा उद्देशाने हा उपक्रम राबविला असुन अग्नी डागा नंतर राख सावडताना उरलेली राख नदी,नाल्यात न टाकता शेतात,घरात जवळ टाकुन त्या ठिकाणी मयत व्यक्तीच्या नावाने एखादे झाड लावुन वृक्ष रोपण कारण्यात यावे असे आवाहन शेवटी केशवराव होन यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News