लायनेस क्लब ऑफ अहमदनगरच्यावतीने सेवाकार्या करणार्‍यांचा सत्कार


लायनेस क्लब ऑफ अहमदनगरच्यावतीने सेवाकार्या करणार्‍यांचा सत्कार

सर्वांना बरोबर घेऊन कोरोनाचा सामना करावयाचा - सुरेखा कदम

  नगर - आजच्या कोरोना काळात सर्वांना आधाराची गरज आहे. एकमेकांच्या मदतीनेच यावर आपणास मात करावयाची आहे.  समाजसेवेचे व्रत जोपासणार्‍या संस्था आणि व्यक्तींमुळेच सेवाकार्य सुरु आहे, अशांचा सन्मान करुन  मदत देऊन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम लायनेस क्लबच्यावतीने करण्यात येत आहेत. लायनेस क्लबच्या सदस्यांनीही सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन या संकटांचा सामना करावयाचा आहे. अमृतवाहिनी मनोरुग्णांची संस्थेचे कार्य अभिमानास्पद असेच आहे. त्याचबरोबरच कोरोना योद्धे असलेले डॉक्टर, नर्सेस यांच्या कार्याला सलामच आहे. यात लायनेस क्लबही मदतीचा हात देत आहे, असे प्रतिपादन लायनेस क्लबच्या अध्यक्ष सुरेखा कदम यांनी केले. लायनेस क्लब ऑफ अहमदनगर च्यावतीने अमृतवाहिनी मनोरुग्णांची संस्था यांना गहू,तांदूळ व धान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे डॉक्टर आणि नर्सेस यांना प्रोत्साहन देण्यासाठी लायन्स क्लबच्यावतीने त्यांचे सत्कार करण्यात आला.  तसेच कोरोना काळामध्ये भाजी  विक्रेत्यांना मास्कचे वाटप,  शिक्षक दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास लायनेस क्लब अध्यक्षा माजी महापौर सुरेखा कदम, सचिव शारदा होशिंग,  डिस्ट्रिक्ट व्हाईस प्रेसिडेंट राजश्री मांढरे, डिस्ट्रिक पास प्रेसिडेंट अश्‍विनी भंडारे, दीपाली आढाव, सविता शिंदे, शारदा पवार, शर्मिला कदम, सुनंदा तांबे, अजिता एडके आदि उपस्थित होत्या.

     याप्रसंगी सचिव शारदा होशिंग म्हणाल्या, लायनेस क्लबने नेहमीच समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. कोरोनाच्या काळात सेवा देणारे, समाजाला आधार देणार्‍यांचा सत्कार करुन त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे. यापुढील काळातही हे सेवाकार्य असेच सुरु राहील, असे सांगितले.यावेळी राजश्री मांढरे, अश्‍विनी भंडारे आदिंनी मनोगतातून क्लबच्या कार्याचा उल्लेख केला. शेवटी अजिता एडके यांनी आभार मानले.


------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News